चांद्या पासून बांद्या पर्यंतच्या महसूलातील निर्ढावलेल्या अधिकारयांचे करावे काय?
लाखात पगार घेता,प्रचंड मानमराबत/प्रतिष्ठेचे धनी हे महाभाग सामान्यांचा सातत्याने अपरिमित छळ करीत असतात.त्यातील एखादाच लाच घेताना रंगेहाथ पकडला जातो.लाज नसेल वाटत का,या नालायकाना.
त्याचप्रमाणे,आदिवासी बालकांच्या वाटेला सकस अन्न तर येतच नाही ही सततची ओरड आहे,त्याचा काहीच जाब न विचारला गेल्यामुळे हे हरामखोर इतके निर्ढावले की आदिवासी बालकांच्या अन्नात अळ्या आढळून आल्या तरी यांना त्याचे वैषम्य वाटू नये.पैसे खाण्याच्या नादात यांनी किमान संवेदनशीलतेला देखील मूठमाती दिली असावी काय?समाजाने यांचे तोंडावर अनेक वेळा थुंकल्यावर देखील हे निलाजरे ढिम्मच.
सरतेशेवटी,मा.अनुसूचित जमाती आयोगाने यात लक्ष घातले तर मा. आयोगाला देखील न जुमानण्याचा प्रमाद यांनी करुन पाहिला.त्यावर,प्रचंड संतापलेल्या आयोगाने यांना अटक वॉरंट बजावले.हेच एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत घडते तर,विरोधी पक्षांनी आणी माध्यमांनी त्याचा राजीनामा घ्यावा म्हणून आकाशपाताळ एक केले असते एव्हांन.आता, दातखिळी बसली काय?.