जीएसटी विभागातील अंधाधुंदी. सेवानिवृत्त निरीक्षक श्री.उटीकर यांचा स्वानुभव……..

विषय:-जीएसटी विभागातील माहिती अधिका-यांनी एकाच विषयावरील अर्जात २ वेगळे वेगळे निर्णय दिले.
अजब कारभार !!!

*माझ्या विभागीय चौकशीच्या प्रकरणात खोटी कागदपत्रे मला आढळून आल्यामुळे, मी जीएसटी विभागातील श्री. ठाकरे, श्री. व्ही. डी. मानापुरे, श्री. डी. जी. घाटेराव, श्री. बी. व्ही. गिरी, श्री. बी. ए. वाडेकर या तत्कालीन ५ संबंधित अधिका-यांवर मुंबई हायकोर्टात क्रिमिनल रिट पेटीशन WP/1640/2018 दाखल केलेले आहे. सदर प्रकरणात प्रथमच कोर्टात सुनावणी दिनांक २०-०९-२०२३ रोजी होणार आहे.*

*तसेच मी माझ्या या वरील प्रकरणातील ५ तत्कालीन अधिकारी हे प्रतिवादी असल्याने व माझी कोर्टाचे कागदपत्रे संबंधित अधिका-यांवर मला बजवायचे आहे. त्यामुळे त्यांचे सध्याचे कार्यालयीन पत्ता अथवा सदर अधिकारी हे सेवानिवृत्त झालेले असतील तर त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाचा कार्यालयात उपलब्ध असलेला पत्ता मला मिळावेत. या एकमेव कारणास्तव जीएसटी भवन माझगांव कार्यालयात मी दिनांक ११.०७.२०२३ रोजीच्या अर्जाद्वारे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती.*

*वरील संबंधित ५ अधिका-यांपैकी श्री. बी. व्ही. गिरी या अधिका-याची माहिती ही संबंधित एका माहिती अधिका-याने मला दिनांक ३१-०७-२०२३ च्या पत्रान्वये पुरविलेली आहे. तर अन्य ४ अधिका-यांची माहिती ही ईतर ३ माहिती अधिकारी आणि ३ अपिल प्राधिकारी यांनी माहिती देण्याचे स्पष्टपणे नाकारलेली आहे.*

*माहितीच्या अर्जात एकाच विषयाशी संबंधित माहिती असताना जीएसटी विभागातील माहिती अधिका-यांनी व अपिल अधिका-यांनी असे २ वेगवेगळे निर्णय घेतले. अशा प्रकारे २ वेगवेगळे चुकीचे निर्णय घेता येत नाहीत.*

*त्यामुळे राज्य माहिती आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयात मी दिनांक ०८-०९-२०२३ रोजी व्दितीय अपिल अर्ज हा दाखल केलेला आहे. तसेच सदर अर्जात माहिती नाकारणा-या संबंधित ३ दोषी आढळणा-या माहिती अधिका-यावर रुपये २५, ०००/- चा दंड व ३ अपिल अधिका-यांवर शिस्त भागाची कारवाई माहितीच्या अधिकारातील कलम २०(१) (२) नियमा नुसार करण्यात यावी.*

*तसेच मला या बाबीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला असल्याने माहिती अधिकारातील कलम १९ (८) (बी) नुसार मला रुपये १०,०००/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती अर्जात केलेली आहे.*

*राज्य माहिती आयुक्त हे सदर प्रकरणात काय निर्णय घेतात ??? ते नंतरच स्पष्ट होईलच*

*आपला स्नेहांकित,*

*श्री. वसंत शामराव उटीकर,*
*सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक,* *भायखळा, मुंबई.*
*भ्रमण. क्र. ९३२४५६१५९१.*
*दिनांक – ०८-०९-२०२३.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!