नाशिकचा लाचखोर तहसीलदार नरेश कुमार बहिरम याला वाचविण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात हात लागले कामाला….
नाशिकचा लाचखोर तहसीलदार नरेश कुमार बहिरम जो महसूल सप्ताह सुरू असतानाच १५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबी च्या सापळ्यात अडकला होता,त्याच नरेश कुमार बहिरम याने,त्र्यंबकेश्वर येथे तहसीलदार पदी असताना नानाविध भ्रष्ट आणी गैरउद्योग केले होते अशी माहिती मिळाल्याने,त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालयाकडे तशी माहिती मी,मागितली.
संतापजनक बाब म्हणजे,त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालयाने दिशाभूल करणारे कारण देत माहिती नाकारली.
एकूण काय तर, महसूल खात्यातील लाचखोराला वाचविण्यासाठी त्याच्या इतर भाऊ बंदांनी कंबर कसल्याचे स्पष्ट होत आहे.जे सामाजिक आणी नैतिकदृष्ट्या अनुचित आहे.