प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत जिल्हा प्रयोगशाळांच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकाऱ्यांची शाळा.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत जिल्हा प्रयोगशाळांच्या माध्यमातून रस्ते, पूल व इमारतींच्या तसेच ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकास कामांच्या साहित्याची चाचणी करण्यासाठी ठेकेदारांमार्फत बांधकामांचे साहित्य जसे स्टील, वाळू, सिमेंट, खडी, पेव्हर ब्लॉक, मुरूम, डांबर व इतर अनुषंगिक साहित्य यांची गुणवत्ता तपासणे कामी या प्रयोग शाळांमध्ये हे साहित्य मागविले जाते. त्या ठिकाणी या सर्व साहित्याची गुणवत्ता, प्रयोग शाळेतील मशीनांच्या द्वारे त्याची तपासून करून आणी नंतरच ते साहित्य बांधकाम विकास कामी वापरात घेतले जाते. मात्र, या प्रयोगशाळेत,सामानाच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी न करता, आर्थिक देवाण घेवाण करीत केवळ प्रमाणपत्रांचे च वाटप होते अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
या संबंधाने अधिकची माहिती लवकरच पुराव्यासह प्रकाशीत केली जाईल.