काकचेष्टा बकोध्यानं श्वाननिद्रा तथैव च।
अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम्॥
अर्थात् (विद्यार्थ्यांमध्ये खालील पाच लक्षणे हवीत – कावळ्याचे गुण (सब ओर दृष्टि, त्वरित निरीक्षण क्षमता), बगळ्याचे ध्यान, श्वानासारखी झोप (थोडासा आवाज झाला तरी उठण्याची तयारी), आवश्यक तेवढे म्हणजेच अल्पाहारी (हवे तेवढेच खाणारा), गृहत्यागी (म्हणजे घरातील इतर गोष्टींकडे लक्ष न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष देणारा).
सुखार्थी वा त्यजेत विद्या विद्यार्थी वा त्यजेत सुखम्।
सुखार्थिनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुतो सुखम्॥
अर्थात् (विद्या हवी असेल तर विद्यार्जन करतेवेळी आळस सोडला पाहिजे, आणि विद्यार्जन करतानाआराम करायचा असेल तर विद्या सोडली पाहिजे)
आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया ।
पादं सब्रह्मचारिभ्यः पादं कालक्रमेण च ॥
अर्थात् ( विद्यार्थी एक चतुर्थांश विद्या आपल्या गुरु कडून घेतो , एक चतुर्थांश विद्या आपल्या बुद्धीने प्राप्त करतो , एक चतुर्थांश आपल्या सहकाऱ्यांकडून व एक चतुर्थांश आपल्या वयानुसार व अनुवानुसार प्राप्त करत असतो.
विद्या दानासारखे पवित्र दान जगात कुठेही नाही.
आजच्या जगात अर्थार्जन करण्यासाठी व स्वतःचे मन व शरीर स्वस्थ राखण्यासाठी खरे खुरे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्ञानार्जन करण्यात व ज्ञान अर्पण करण्यात तसेच त्याचा वापर योग्य ठिकाणी अचूकपणे करण्यातपरमेश्वराच्या सेवेचा अंश असतो व त्यासारखा आनंद ह्या जगात दुसरा कोणताही नाही ज्ञानी लोक जगात नसते तर आज झालेली प्रगती आपल्याला कधीही दिसली नसती.
तात्पुरते एवढेच…
जय हिंद जय महाराष्ट्र!!
विद्यासागर : 7738758295