दिनांक:२७/०१/२०२३
प्रती
सन्माननीय महासंचालक महोदय
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
महाराष्ट्र राज्य.
विषय: मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांनी शासन नियमांचा जाणून बुजून भंग करीत, विश्वासघात करीत बेकायेशीररित्या TET उत्तीर्ण नसताना बोगस उमेदवारांना शिक्षक म्हणून मान्यता दिली त्यांचे विरोधात योग्य ती कडक कारवाई होणे बाबत…….
सोबत: जोडलेले,मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांना लिहिलेले पत्र (ई मेल द्वारे).
सन्माननीय महोदय
उपरोक्त संदर्भिय विशयांवये सविनय तक्रार अर्ज करीतो की,मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांनी,शासन नियमांचा जाणून बुजून भंग करीत, विश्वासघात करीत बेकायेशीररित्या TET उत्तीर्ण नसताना बोगस उमेदवारांना शिक्षक म्हणून मान्यता दिली असे माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीवरून सिध्द झाले आहे. या संबंधाने आम्ही,मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांना लेखी तक्रार देखील केली आहे,मात्र त्याची काही एक दखल,मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार हे घेत नाही.
महोदय,मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांनी, स्वतःचे आर्थिक हित साधण्याच्या नादात शासनाचा तसेच शिक्षक उमेदवारांचा विश्वासघात करीत,TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवाराना शिक्षक पदासाठी मान्यता दिली. त्यामुळे ते फौजदारी गुन्ह्यास देखील प्राप्त आहेत.सबब,मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार यांचे विरोधात सर्वंकष चौकशीअंती योग्य ती कायदेशीर कारावाई होणेस नम्र विनंती आहे. कळावे,
धन्यवाद.
आपला विश्वासू
राहुल चंद्रकांत भारती.
मो. क्र.८३९०५४५५८८.