धुळे शहरातील एरव्ही सोशिक असणारे नागरीक देखील व्यक्त होवू लागले आहेत.
मनपाने नेमून दिलेला कर इमाने इतबारे, वेळच्या वेळी भरून देखील,मनपा मात्र किमान जीवनावश्यक सोयी देखील पुरवित नाही. तशी तक्रार किंवा विचारणा करण्यासाठी नागरीक,मनपा कार्यालयांत पोहोचले तर त्यांची दाद फिर्याद घेतली जात नाही.
मनपाचे तमाम कारभरी,धुळे शहरातच कुटुंबा सह वास्तव्यास आहेत.इतर नागरिकाना जो त्रास भेडसावतो आहे,खरेतर तोच त्रास त्यांना देखील भेडसावित असावा किमान त्यानी तरी त्यांच्या घर धन्यास या संबंधाने विचारणा करण्यास हरकत नसावी.बहुदा ते देखील होत नसावे काय?
घरच्या लक्ष्मी ने घोषा लावला तरी या मनपाच्या कारभारयाना आपल्या कामात नक्कीच सुधारणा करणे अगत्याचे होइल. त्यातनं त्यांचे देखील जीवन सुखकर होवू शकते. यदकदाचित त्यानाच जर घाणीची सवय झाली असेल तर मात्र,या शहराला परमेश्वर च वाचवू शकेल.
तुर्तास, एव्हढेच!!