दुर्दैवाचे दशावतार मुख्यमंत्री महोदांना ना,आरटीओ जुमानत नाही जिल्हाधिकारी!!

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर आरूढ होवून बराच कालावधी लोटला.भाजपाच्या मदतीनं बंडखोरी करीत त्यांनी आपले इप्सित साध्य केले खरे.माञ, राज्याच्या विकासाला दिशा देण्याचेच ते विसरले असे दिसतंय.
त्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रशासनावर त्यांना अद्यापही पकड बसविता आली नाही, जरब तर दूरची गोष्ट.पैसा फेकून तुम्हाला पद,प्रतिष्ठा खरेदी करता येईलही मात्र,वकुबाचे तसे नसते. आणी येथेच शिंदेंचे घोडं पेंड खातंय.
प्रशासन हे पक्कं बिलंदर, मुळातच शिक्षित आणी उच्चशिक्षित त्यांच्या लेखी,शिंदे अगदीच नवशिके,अपघाताने पदस्थ झालेले अल्पशिक्षित,प्रशासनातील बारकावे ठावूक नसणारे ग्रहस्थ.
शासन निर्णय केवळ कागदावर ठेवून कार्यभाग साधणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ आणी बेरकी बाबूंवर शिंदेंचा मुळीच प्रभाव जाणवत नसल्यामुळे सामान्य जनता मात्र त्रस्त असल्याचे जाणवते.
शेतकऱ्यांना आवश्यक असणारी,त्यांच्या हक्काची विज,बाबू मंडळींवर ते देखील विनामूल्य खर्च होताना असहायपणे शेतकरी पहातोय.
मुखमंत्र्यांच्या अखत्यारीतील परिवहन खात्याचे तर कधीच मागच्या दाराने खाजगीकरण झालंय त्याचा शिंदेंना मागमूस देखील नसल्याचे,अलीकडच्या काही प्रकरणांवरून स्पष्ट झालंय.
केवळ स्वतःची तुंबडी भरण्याच्या नादात,मुख्यमंत्र्यांना देखील फाट्यावर मारण्याची प्रशासनाची हिंमत पहाता,कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही हेच खरे.त्यामुळे सामान्यांची होरपळ होत आहे हे मात्र खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!