धुळे दि.१५(यूबीजी विमर्श)
धुळे शहरातील जमनागिरी परिसरात असलेल्या बजरंग चौकातील एका घरात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आली.जमनागिरी परिसरातील बजरंग चौकातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ नगराळे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या विनोद उर्फ बादल सोहीके आणि नीता गांगुर्डे सोबत राहत होते, चारित्र्य संशयातून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.काल रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याने त्यात नीताचा गळा आवळून विनोद उर्फ बादल सोहीके ने खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
आज सकाळी जमनागिरी भागात पाणी आले असल्याचे निता सोहीकेला घरासमोर राहणाऱ्या एका मुलीने सांगायला गेली असता,त्या मुलीने अंथरुणात निता सोहीके हिचा मृतदेह पाहिल्याने ति मुलगी घाबरून गेली. तिने लागलीच आजूबाजूची लोकांना या संदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात आजूबाजू परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली.आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली या संदर्भात आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले की, विनोद उर्फ बादल हा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून निता हिला मारहान करीत असे,काल रात्री देखील चारित्र्याच्या संशयावरून विनोदने निता हीला बेदम मारहाण केली असल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. आणि नेहेमीप्रमाणे सकाळी ८.३० वाजता विनोद सोहीके हा घरून देवपूजा करून आपली रिक्षा घेऊन बाहेर निघून गेला त्यानंतर ही घटना उघडकीस आली. विनोद सोहीके हा धुळे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. आणि तो आपले ड्युटी झाल्यानंतर रिक्षा चालक असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचासह शहर पोलीस ठाण्याचे पथकासह फॉरेन्सिक टीम घेऊन दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. संशयित आरोपी विनोद उर्फ बादल सोहीके सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.