अभ्यास आनंदमयी करूया…. चिंता व काळजी सोडा!!

मित्रांनो विश्वभारती न्यूज चैनल तर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.

विद्यार्थी विशेष सदरात आपल्याशी प्रथमच हितगुज करताना अत्यंत आनंद होत आहे.

श्री गणेश व सरस्वती मातेच्या चरणी शब्दरूपी पुष्प सुमने वाहून व आशीर्वाद मागून हा प्रवास सुरू करूया.

अभ्यास आनंदमयी करूया….

चिंता व काळजी सोडा!!

आणि अभ्यासात सहजरित्या अव्वल होऊन ज्ञानार्जन करून आपले आयुष्य घडवूया.

सिनेमा पाहताना जसं आपण आनंदी होतो , मग अभ्यास करताना सुद्धा आपण आनंदाने अभ्यास करून आपले भविष्य कसे घडवू शकतो याविषयी आपण या सदरात वेळोवेळी चर्चा करण्याचा संकल्प केलेला आहे.

विद्यार्थ्यांशी संबंधित अनेकानेक विषय या सदरात वेळोवेळी आपण हाताळण्याचा संकल्प केलेला आहे.

मग त्यात

  • अभ्यासासाठी योग्य शाखेची निवड
  • स्पर्धा परीक्षांसाठी ची तयारी
  • खाजगी व सरकारी क्षेत्रातील अनेक संधी

स्किल डेव्हलपमेंट संबंधीची चर्चा अशा अनेक गोष्टी वेळोवेळी आपणांसमोर आम्ही घेऊन येत आहोत.
विद्यार्थ्यांना शाखेची निवड कशी अचूक करता येईल याविषयीचे मार्गदर्शन, विशिष्ट क्षेत्रातील संभाव्य संधी याविषयीच्या चर्चा या सदरात आपण करणार आहोत व अभ्यास सहजरित्या व मजेशीरपणे आनंदात कसा करता येईल याविषयीच्या सूचना अगदी सहज सोप्या रीतीने आम्ही वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करू.

विद्यार्थी विशेष या सदरात येणाऱ्या काळात आपण काय उपक्रम राबविणार आहोत याविषयी थोडक्यात माहिती देत आहे.

विद्यार्थी विशेष सदरात

अभ्यास का? कुठे आणि कसा करावा याविषयी आम्ही सतत नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर करिअर गायडन्स किंवा परीक्षे विषयीची भीती मनात कशी ठेवू नये व परीक्षेत घवघवीत यश कसे प्राप्त होईल व कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क स कसे मिळतील व त्याचबरोबर आपल्याला आपल्या सोबत कायम राहणारे ज्ञान कसे लक्षात राहील याविषयीच्या सूचना व मार्गदर्शन आम्ही अगदी सहज रीत्या करणार आहोत,

चर्चा ऑनलाइन झूम मीटिंग वर मागणीनुसार पालक व विद्यार्थ्यांबरोबर दर आठवड्याला ” चला चर्चा करूया” व सोपा बनवूया प्रत्येक विषय या मथळ्याखाली करण्याचा संकल्प आहे, तसेच समोरासमोर
1) पालकांशी हितगुज
2) विद्यार्थ्यांशी चर्चा
3) पालक व विद्यार्थ्यांशी चर्चा

जेणेकरून पालकांना मुलांच्या अभ्यासाविषयी असलेली काळजी ही खूप कमी होईल व विद्यार्थ्यांचा देखील आत्मविश्वास वाढेल, त्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही वेळोवेळी देत राहू.

आपण आपले जीवन व करिअर उत्तमरीत्या कसे घडवू शकतो याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती जी एवढ्या वर्षाचा अनुभवातून व शैक्षणिक क्षेत्र व औद्योगिक क्षेत्रात काम केल्यावर मिळालेली आहे त्याच्या आधारे प्रत्यक्ष उदाहरणांच्या द्वारे अत्यंत सहजरित्या सोप्या आणि सरळ भाषेत मराठीत किंवा हिंदीत किंवा इंग्रजीमध्ये आपणास देण्यात येईल.

विद्यासागर : 7738758295

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!