बृहन्मुंबई खंडपीठाचे माहिती आयुक्त सुनिल पोरवाल आणी त्याच्या कार्यालयातील साथीदारां विरोधात उच्च न्यायालयात, त्रासलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली.
मुजोर आणी बेजबाबदार माहिती आयुक्त सुनिल पोरवाल याने आपल्या बेमुर्वतखोर वागणूकीमुळे माहिती अधिकार कायद्याचे कधीही भरून न येणारे नुकसान केले आहे. पोरवाल च्या विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्यात मात्र,शासन प्रशासनात त्याची प्रचंड जरब असल्यामुळे त्याचे विरोधात काही केल्या कारवाई होत नव्हती हे ध्यानात आल्यावर सोलापूर येथील कार्यकर्ता श्री. हनाप्पा काळे यांनी थेट उच्च न्यायालयात पोरवाल याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे समजते.मा. उच्च न्यायालयाने तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत, सुनिल पोरवाल याच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी अपेक्षा जन सामन्यात व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!