असित कुमार मोदी यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या आजच्या भागाची झलक : ‘कभी नहीं!’ पोपटलालच्या लग्नाच्या स्वप्नांना अनपेक्षित अडथळा!पोपटलाल आपल्या होणाऱ्या वधूच्या कुटुंबीयांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्याआधीच त्याच्या घरी घराची पाहणी करण्यासाठी एक इन्स्पेक्टर दाखल होतो. सुरुवातीला नेहमीची तपासणी वाटणारा हा प्रकार पुढे पोपटलालसाठी चांगलाच अडचणीचा ठरतो.इन्स्पेक्टर घराची पाहणी करताना पोपटलालचा टीव्ही तब्बल २५ वर्षे जुना असल्याचे सांगतो. घरात एसी किंवा मायक्रोवेव्ह नाही, तसेच गॅसची शेगडीही खराब अवस्थेत असल्याचे त्याच्या निदर्शनास येते. पोपटलाल शेगडी व्यवस्थित सुरू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण शेगडीचे बटणच त्याच्या हातात निघून येते! त्यानंतर तो फ्रिजची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. फ्रिजचा दिवा बंद असला तरी आत थंडावा असल्याचे तो सांगतो. मात्र, इन्स्पेक्टर फ्रीजर तपासतो तेव्हा त्यात बर्फसुद्धा तयार होत नसल्याचे समोर येते.घराची पाहणी पूर्ण झाल्यानंतर पोपटलाल उत्सुकतेने मुलीकडचे लोक त्याला आणि त्याच्या घराला भेटायला कधी येणार, असे विचारतो. मात्र, इन्स्पेक्टरचे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तो स्पष्टपणे सांगतो, ‘कभी नहीं!’ कारण मुलीला घरात या सर्व सुविधा हव्या आहेत आणि पोपटलालच्या घरी त्यापैकी एकही सुविधा उपलब्ध नाही. हे ऐकून महिला मंडळही आश्चर्यचकित होते. पुन्हा एकदा पोपटलालच्या लग्नाच्या स्वप्नांना मोठा धक्का बसतो.घराची अशी अवस्था असतानाही पोपटलाल मुलीकडच्यांची समजूत काढण्यात यशस्वी होईल का? की पुन्हा एकदा त्याच्या हातून लग्नाचे स्थळ निसटणार?पाहायला विसरू नका, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा हा रंजक भाग आज रात्री ८:३० वाजता, फक्त सोनी सबवर!आजच्या भागाची झलक पाहण्यासाठी लिंक :https://youtu.be/icVucuGg_bI?si=D875d4Cow5c_s5Xxमागील भागाचा आढावा :विभा कराडो मॅरेज ब्युरोच्या शुभ मंगल यांच्याकडून कांदिवली येथील एका कुटुंबाला पोपटलालचे स्थळ पसंत पडल्याचे आणि त्यांना त्याला भेटायचे असल्याचे समजताच पोपटलालचा आनंद गगनात मावेनासा होतो. विशेष म्हणजे, हे कुटुंब अवघ्या एका तासात त्याच्या घरी भेटायला येण्यास तयार असते. त्यामुळे पोपटलाल आनंदी होतो, पण त्याचवेळी घराच्या सध्याच्या अवस्थेची चिंता त्याला सतावू लागते.हातात फारसा वेळ नसल्याने पोपटलाल रुपा आणि महिला मंडळाची मदत घेतो. महिला मंडळातील सर्वजणी लगेच मदतीला धावून येतात आणि घराची स्वच्छता व सजावट करण्याची जबाबदारी आपापसांत वाटून घेतात. काही जणी हॉलची व्यवस्था पाहतात, तर काही स्वयंपाकघर आणि पाहुण्यांच्या अल्पोपहाराची तयारी करतात. पोपटलालला तयार होण्यासाठीही त्या मदत करतात. तसेच या खास प्रसंगासाठी कोणता पोशाख योग्य ठरेल, याबाबतही त्याला मार्गदर्शन करतात.महिला मंडळाच्या मेहनतीमुळे घर स्वच्छ आणि सुंदर सजवले जाते. हे पाहून पोपटलाल खूश होतो आणि मुलीकडच्या मंडळींवर चांगली छाप पाडण्याचा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण होतो.मागील भाग पाहायचा राहिला का? येथे पाहा :https://youtu.be/l1lT-65Zzqo?si=2QGyTvLzBJbqB4bL
vishwabharatinews
