26 Nov 2026, Thu

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फराळ वाटप कार्यक्रम

दुष्काळ गंभीर शिवसेना खंबीर; ट्युशन फी माफीसाठी प्रयत्न करणार : सचिन सानप

पुणे : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून त्यावर मार्ग काढण्यासाठी शासन व शिवसेनेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. दुष्काळ गंभीर असला तरी त्यावर मात करण्यासाठी शिवसेना खंबीर आहे. शिवसेनेतर्फे पुण्यातील विविध भागातील सुमारे 1000 हजार गरजू विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

तसेच शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. मात्र केवळ परीक्षा फी नाही तर ट्यूशन फी माफीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. शासनाने ट्यूशन फी माफ करावी आणि स्वत: ट्यूशन फीचा भार उचलावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे,असे प्रा.सचिन सानप यांनी सोमवारी सांगितले.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेतर्फे सचिव किरण साळी यांच्या वतीने आयोजित दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनासाठी दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सानप बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर, युवासेनेचे सचिव किरण साळी,यावेळी युवा सेनेचे शहराध्यक्ष निलेश गिरमे, युवासेनेचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष योगेश बेंद्रे, युवासेनेचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केंद्र प्रमुख गोरक्ष कांबळे, निलेश खाडे, मंदार गिरमे, अक्षय फूलसुंदर, सागर कडू, मयूर जगताप आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवारांच्या हस्ते 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांमबरोबर फराळ केले.

सानप म्हणाले, राज्य शासनाने 310 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेतर्फे दुष्काळाने होरपळणाऱ्या प्रत्येकाला आधार देण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला जाणार आहे. राज्यात अनेक भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.अनेक ठिकाणी दोन डब्यांमध्ये तीन विद्यार्थी जेवण करत आहेत. उद्याचा भविष्यकाळ चांगला करण्यासाठी आपल्याला उमेद सोडून चालणार नाही. प्रत्येक समस्येला उत्तर असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांशी संपर्कात राहावे. त्याना धीर द्यावा.आता विद्यार्थ्यांनी पालक होण्याची गरज आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, शिवसेनेची बांधिलकी समाजाशी आहे. दुष्काळी परिस्थितीत गरजवंत विद्यार्थी व नागरिकांना मदत करण्याचे काम केले जाणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिवाळी फराळ आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.विद्यार्थ्यांनी दुष्काळी परिस्थितीत आपल्या गावातील नागरिकांच्या संपर्कात राहावे.त्यांना धीर देण्याचे काम करावे. शेतकरी आत्महत्या हा गंभीर प्रश्न असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी पालक बनून आपल्या गावातील लोकांशी संभाषण करून आधार द्यावा.शासनाच्या विविध योजना नांगरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे.

स्टुटेंट हेल्पिंग हॅंडचे कुलदीप आंबेकर म्हणाले, दोन वेळचे जेवण वेळेत न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून फूड स्कॉलरशिप योजना सुरू केली जात आहे.त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button