26 Nov 2026, Thu

पाठीमागे मृत्यू अन् जीवाच्या आकांताने धावाधाव…. 26/11ची न ऐकलेली कहाणी

सर्वजण सुरक्षित जागा पकडायचा प्रयत्न करत होते. सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत होती. दहशतीखाली वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक अज्ञात, अनोळखी व्यक्ती गणधारी वाटत होती. त्यावेळी त्या डब्यात अठरा प्रवासी होते. सोलापूर येथील महिला होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सागर सुरवसे, प्रतिनिधी:  26 नोव्हेंबर 2008.. मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील काळरात्र… याचदिवशी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला.पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरिमन हाऊस यांसह अनेक गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. आज या भ्याड हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. हा हल्ला आपल्या डोळ्यांनी पाहिलेले करमाळयातील माजी नगरसेवक फारुक जमादार यांनी Tv 9 मराठीशी बोलताना या दिवशीच्या कठू आठवणी सांगितल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button