26 Nov 2026, Thu

पुण्यात न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा गोळीबार, सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, गृहखात्याकडे मोठी मागणी

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर सहा जणांच्या टोळक्याकडून एकावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराचा नेम चुकल्यानंतर या टोळक्याकडून कोयत्याने देखील हल्ला करण्यात आला. या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मंदार किवळे असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विशेष म्हणजे मंदार किवळे हा देखील एका हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तो काही दिवसांपूर्वीच जमीन मिळाला होता, तो आपल्या काही कामासाठी न्यायालयात आला असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button