एकूण 14 देशांवर हा टॅरिफ लादला जाऊ शकतो. भारताचाही यात सामावेश असल्याने भविष्यात त्याचा फटका भारताला बसू शकतो. चीनने मात्र या निर्णयाला कठोर विरोध करणे सुरू केल्याने भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह एकूण 14 देशांवर पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्तावही समोर आलाय. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली तर त्याचा सर्वाधिक फटका हा चीनला बसणार आहे. भारताचेही भविष्यात नुकसान होऊ शकते. दरम्यान, आता अमेरिकेच्या या धोरणाविरोधात चीनने आक्रमक पवित्रा धारण केलाय. अमेरिकेने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा अन्यथा आम्ही आवश्यक ते पाऊल उचलण्याचा आमचा अधिकार सुरक्षित ठेवलेला असून योग्य तो निर्णय घेऊ, असा इशारा चीनने अमेरिकेला दिलाय.

